पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरातील प्रसिद्ध बुधानी वेफर्सचे माल राजूशेठ बुधानी यांचे आज मंगळवार रोजी सकाळी निधन झाले आहे. ते 75 वर्षाचे होते. बुधानी यांचे निधन अल्पशा आजाराने झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. बुधानी यांचे वेफर्स पुण्याबरोबर परदेशातही प्रसिद्ध असून त्यांच्या वेफर्सला सर्वीकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बुधानी यांनी 55 वर्षापुर्वी आपला वेफर्सचा व्यवसाय सुरु केला होता. सुरुवातीला छोट्या दुकाना पासून विक्री करुन आज बुधानी वेफर्सने मोठ्या प्रमाणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान बुधानी व्ययायाबरोबर सामाजिक क्षेत्रात सुध्दा सक्रिय असल्याचे बघायला मिळाले आहेत. त्यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव सुद्धा करण्यात आला आहे.