मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – Raj Kundra Arrested |अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सोमवारी रात्री अटक (Raj Kundra arrested) केली आहे. अश्लिल चित्रपट (pornography movie) बनवून ते मोबाईल अॅप्लिकेशन(Mobile application)द्वारे प्रसारित केल्याप्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात तो मुख्य सुत्रधार असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने राज कुंद्राला अटक करण्यात आली (Raj Kundra arrested) आहे.
https://twitter.com/ANI/
याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 20 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अश्लिल चित्रपट (pornography movie) बनवणे आणि ते वेगवेगळ्या ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रसारित करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात या अगोदर 4 जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींचे जबाब आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे राज कुंदा याला अटक करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एक बेकायदेशीर अॅप बनविले होते. त्यावर अश्लिल चित्रपट (pornography movie) प्रसारित केले जात होते. हॉटशॉटHotshot) नावाचे हे अॅप बनविले होते. त्यावर चित्रपट प्रसारित होत.
त्यानंतर लोकांकडून पैसे घेऊन त्यांना त्याचा एक्सेस दिला जात होता.
बॉलीवूड(Bollywood)मध्ये कामाच्या शोधासाठी येणार्या गरजवंत तरुणींना या कामात फसवले जात होते. मोठ्या चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने अश्लिल चित्रपटात (pornography movie) काम करवून घेतली जात होती.
मालाड पश्चिमMalad West) येथील मढगावमधील एका बंगल्यावर सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे व त्यांच्या पथकाने छापा घातला.
तेव्हा तेथे अश्लिल चित्रपटाचे (pornography movie) शुटिंग सुरु होते.
त्यातून हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला होता.
web title: Raj Kundra Arrested | Actress Shilpa Shetty’s husband Raj Kundra arrested in pornographic film publishing case
PF चा लाभ घ्यायचा असेल तर फॉर्म 10C बाबत जाणून घ्या, अन्यथा नंतर काढू शकणार नाही पैसे