बहुजननामा ऑनलाईन
मुंबई : 12 ते 17 ऑक्टोबर दरम्यान राज्यात कोकणासह आतील भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागांत बहुतांश ठिकाणी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, 12 ऑक्टोबरपासून 17 ऑक्टोबरपर्यंत विजांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस सक्रिय असेल. 12 ऑक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात 13 ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी जोरदार तर, कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात 14 व 15 ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी जोरदार तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे.