नवी दिल्ली :वृत्तसंस्था (online) – रेल्वे तिकिट बुक (Railway Ticket Booking) करण्यारी रॅकेट नष्ट करण्यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railway) नवीन व्यवस्था आणत आहे. आगामी काळात रेल्वे तिकिट बुक (Railway Ticket Booking) करण्यासाठी तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक (Aadhaar Card Pan Card Linking) असणे आवश्यक होणार आहे. असे न केल्यास आयआरसीटीसी (IRCTC) तुमचे तिकिट बुक (Ticketing Book) करणार नाही.
याशिवाय आयआरसीटीसी तुमच्याकडे पासपोर्ट(Passport)किंवा इतर ओळखपत्र सुद्धा मागू शकते. ही सर्व पडताळणी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर होईल, जिच्याद्वारे तुम्ही तुमचे तिकिट बुक करता. रेल्वे सुरक्षा दलाचे डायरेक्टर जनरल अरुण कुमार(Arun Kumar, Director General, Railway Security Force) यांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे.
त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, यापूर्वी दलालांना रोखण्यासाठी जे उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये आर्टिफिशियल इन्टेलिजन्स(Artificial Intelligence)चा उपयोग झाला नव्हता. याच कारणामुळे ते सर्व यशस्वी ठरले होते. याच कारणामुळे तिकिट बुक करणार्या दलालांना रोखण्यासाठी ऑनलाइन पावले उचलण्याची आवश्यकता होती.
आयआरसीटीसीकडे अपडेट झाली आधारची माहिती
अरूण कुमार यांनी म्हटले, हा भविष्यातील आमचा प्लॅन आहे. आम्हाला सर्वप्रथम एक नेटवर्क बनवण्याची आवश्यकता आहे. आम्ही आधार प्राधिकरणासोबत आमचे जवळपास पूर्ण काम केले आहे. इतर विभागांसोबत सुद्धा ही प्रक्रिया सुरू आहे. पूर्ण सिस्टम काम करण्यासाठी तयार होताच आम्ही तिचा वापर करण्यास सुरूवात करू.