नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लॉकडाऊनच्या ( lockdown) काळात गेल्या सात महिन्यांपासून ठ्प्प असलेले बार, पब्ज (Bars and Pubs ) आता नियम, अटीस सुरु झाले आहेत. पण नवी मंबईत सरकारी नियम पायदळी तुडवत बेफामपणे बार आणि पब्ज सुरु असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police ) एका बारवर धाड टाकली असून अनाधिकृत हुक्का पार्लरवर (Hookah Parlor) कारवाई केली आहे. यात तब्बल 211 तरुण- तरुणींना ताब्यात घेतले आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी (दि. 7) रात्री ही कारवाई केली अनाधिकृतपणे हुक्का चालवणे, गर्दी जमवणे, कोरोनाच्या परिस्थितीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रकरणी बारवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाआहे. या कारवाईमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.
शहरातील कॅफे पाम अटलांटिस या बारवर ही कारवाई केली आहे. शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने बारमध्ये अनाधिकृतपणे हुक्का पार्टीचे आयोजन केले होते. याची माहिती नवी मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बार छापा टाकला असता तेथील गर्दी पाहून ते देखील हैराण झाले होेते. बारमध्ये जंगी हुक्का पार्टी सुरु होती. पार्टीत तब्बल 211 तरुण- तरुणीचा समावेश होता. त्या तरुण- तरुणींना बार बाहेर काढतांना पोलिसांची दमछाक झाली होती. बारमध्ये 50 टक्के ग्राहकांच्या क्षमतेसह परवानगी दिली आहे. पण नवी मुंबईत सवर्च नियम पायदळी तुडविण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात नवी मुंबईतील पाम बीच गॅलेरीया मॉलमधील एजेन्ट जॅक्स बारमध्ये गर्दी खेचण्यासाठी धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चित्र- विचित्र जाहिराती केल्या होत्या. पुरुषांसाठी नो शर्ट, नो सर्व्हीस, तर महिलांसाठी नो शर्ट फ्री बियरची ऑफर या बारमध्ये ठेवली होती. हा प्रकार भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला होता.