बहुजननामा ऑनलाईन टीम : लोकगायिका सुषमा नेकपूर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ग्रेटर नोएडा येथील मित्रा सोसायटीजवळ दोन अज्ञात बाइक स्वारांनी सुषमा यांची एका पाठोपाठ एक अश्या ४ गोळ्या झाडत हत्या केली. यात सुषमा यांचा जागीच मृत्यू झाला. बुलन्दशहरच्या नेकपूर गावच्या सुषमा रागिणी गायिका होत्या. सध्या त्या मित्रा सोसायटी येथे वास्तव्यास होत्या.
सुषमा मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास ग्रेटर नोएडा येथे परतत असताना हा हल्ला झाला. मित्रा सोसायटीत गाडीतून उतरत असताना दोन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर सुषमा जागीच कोसळल्या, त्यांना तातडीने रूग्णालयात भरती करण्यात आले, परंतु त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. याआधी १९ ऑगस्टला देखील एका गाण्याच्या कार्यक्रमाला गेली असता सुषमा यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावर आता पुन्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
दरम्यान, सुषमा यांच्या ४ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. सध्या त्या गजेंद्र भाटी या व्यक्तीसोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. सुषमा गायिका असल्याने तिच्या आणि तिच्या पतीमध्ये नेहमी भांडणे होत असे. घटस्फोट घेतल्यानंतरही तिचा नवरा तिचा पाठलाग करत असे. याविरुद्ध त्यांनी तक्रारदेखील नोंदविली होती. तसेच गावी जमिनीवरूनही एका व्यक्तीशी सुषमा यांचा वाद सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Visit : bahujannama.com