रायबरेली : वृत्तसंस्था – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये(Lockdown) अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करुन सामानाची विक्री होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. महाराजगंज रोडवरील एका दुकानातून गुपचूप दारु विक्री होत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
बीयर विक्री करणाऱ्या दुकानाचा मुख्य दरावाजा बंद ठेवून भिंतीमधून दारुच्या बाटल्यांची विक्री केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांकडून अधिक रक्कम घेतली जाते. ग्राहकांना दारू पुरवण्यासाठी भिंतीत होल तयार करण्यात आले आहे. या होलमधून ग्राहकांना दारूच्या बाटल्या पुरवल्या जातात. दारुची विक्री संध्याकाळी सात नंतर करण्यात येते. यासाठी ग्राहकांकडून 20 ते 100 रुपये अधिकचे घेतले जातात. तर बीयरच्या एका कॅन आणि बाटलीमागे 20 ते 50 रुपये अधिक आकारले जात आहेत.
#RaebareliPolice: अब रायबरेली में चोरी छिपे दीवारों के सुराख दे दी जा रही है शराब, वीडियो वायरल। @raebarelipolice @Uppolice @myogioffice pic.twitter.com/g9Ptfr4YUh
— Rafiya Naz (@raafiyanaz) May 27, 2021
गस्त घालणाऱ्या पोलिसांचे दुर्लक्ष
महामार्गावर नियमांचे उल्लंघन करुन अशा प्रकारे दारुची विक्री केली जाते. गस्त घालणाऱ्या पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पोलिसांकडे संशयाने पाहिले जात आहे. दुकानाचे पुढील दार बंद करुन मागील बाजूला भिंतीला होल पाडून दारुची विक्री केली जात आहे. दुकानाच्या पाठिमागून अशा प्रकारे दारुची विक्री होत असल्याची माहिती तळीरामांपर्यंत पोहचवण्यासाठी काही व्यक्तींवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे व्यक्ती तळीरामांना दुकानाच्या पाठिमागे दारु विक्री होत असल्याची माहिती देतात.