बहुजननामा ऑनलाईन- उरण येथील ओएनजीसी मधील आगीची घटना ताजी असतानाच पंजाबमध्येही फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील गुरूदासपूर जिल्ह्यातील बाटला येथे बुधवारी (ता.४ ) फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. यात 19 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. तर दोन इमारतीत पन्नास जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजुबाजुच्या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
Gurdaspur Sub-Divisional Magistrate, Deepak Bhatia: 16 people have died and 10 people have been injured in the fire. https://t.co/Uiza9tMNoz
— ANI (@ANI) September 4, 2019
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. यात जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालात दाखल करण्यात आले असून त्याच्यांवर उपचार करण्यात येत आहेत. दोन इमारतीत अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथक तेथे कार्यरत आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. स्फोटानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. या धुरामुळे बचाव दलाला लोकांना बाहेर काढताना अडचणी येत आहे, असे बचाव पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
Gurdaspur: Fire breaks out at a fire-crackers factory in Batala; fire tenders present at the spot. More details awaited. #Punjab pic.twitter.com/bp5P5Xq88y
— ANI (@ANI) September 4, 2019