चंढीगड : वृत्तसंस्था – Punjab Assembly Election | पुढील वर्षी (2022) मध्ये पाच राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभुमीवर त्या-त्या राज्यातील पक्षाने आपली कंबर कसली आहे. पाचपैकी पंजाब राज्यातही निवडणुक होणार आहे. तर, भारतीय चित्रपट अभिनेता सोनु सुद (Actor Sonu Sood) याची बहिण पंजाब विधानसभा निवडणूक (Punjab Assembly Election) लढवणार असल्याचं समोर आलं आहे.
कोरोनाच्या महामारीत अभिनेता सोनु सुद (Actor Sonu Sood) गरीबांच्या मदतीसाठी पुढे सरसावला होता. त्या काळात अनेक गरीब नागरीकांसाठी सोनु सुदने दोन हात केले होते. दरम्यान, आता राजकीय पक्षांकडून सोनु सदला पंजाब निवडणूक लढवण्याची ऑफर मिळाली होती. पंरतु सोनु सुदने ही ऑफर नाकारली असल्याचं समजते. (Punjab Assembly Election)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, अभिनेता सोनु सुदची बहिण मालविका सुद सुच्चर (Malvika Sood Suchar) पंजाब विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झाल्याचे कळते. दरम्यान, मालविका कोठुन निवडणूक लढवणार? आणि मुख्य म्हणजे कोणत्या पक्षातून निवडणुकीस उभं राहणार? याबाबत माहिती अद्याप समोर आली नाही.
web tittle : Punjab assembly election sonu soods sister contest punjab assembly polls.