पुणे : बहुजननामा ऑनलाईन – खडकी येथील गुरूद्वारा (Khadki Gurudwara) श्री गुरु सिंह सभा परिसराच्या नूतनीकरणाच्या कामासाठी पुनीत बालन ग्रुपचे Punit Balan Group (PBG) अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन (Young Entrepreneur Punit Balan) यांनी 21 लाख रुपयांची देणगी दिली आहे.
खडकी गुरुद्वारा परिसर विकासाचा एक उद्घाटन सोहळा पुनीत बालन यांच्या हस्ते आणि माणिकचंद ऑक्सिरिचच्या (Manikchand Oxyrich) सीएमडी जान्हवी धारीवाल-बालन (Janhavi Dhariwal Balan) यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. यावेळी पुनीत यांच्या मातोश्री इंद्राणी बालन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दगडी कोरीव नावाच्या फलकाचे उद्घाटनही बालन दापत्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालन यांनी श्री गुरु सिंह सभा गुरुद्वाराच्या नूतनीकरणाच्या कामासाठी २१ लाख रुपयांची भरीव देणगी दिली. एल्फिन्स्टन रोड, खडकी येथील हा गुरुद्वारा अतिशय जुना आहे.
बालन यांनी दिलेल्या देणगीतून गुरुद्वाराच्या नूतनीकरणाचे काम मार्गी लागणार आहे. बालन यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा खडकीचे अध्यक्ष गैरसगुरबीर सिंग ओबेरॉय आणि व्यवस्थापन समितीने त्यांचे आभार मानले. तर पवित्र अशा गुरुद्वाराच्या नुतनीकरणाच्या कामात या देणगीच्या माध्यमातून खारीचा वाटा मला उचलता आला याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया पुनीत बालन यांनी दिली.
- Pune Khadak Police | व्यापार्याच्या दुचाकीच्या डिकीतून 11 लाख 50 हजार रूपये चोरणारा सराईत अटकेत ! खडक पोलिसांकडून 500 CCTV कॅमेर्यातील फुटेजची तपासणी
- Pune Vishrantwadi Crime | सोशल मीडियात तरुणींशी मैत्री करून देण्याचे आमिषाने तरुणाला लुटणारी टोळी अटक
- Pune Yerawada Crime | गावठी दारुची भट्टी लावणार्या महिलेला अटक ! 3 हजार लिटर रसायन केले जप्त
- Pune Sahakar Nagar Crime | दुसर्या कंपनीला परस्पर माल विकून 32 लाखांचा घातला गंडा; 8 जणांवर गुन्हा दाखल
- Pune Bibvewadi Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन टोळक्याचा कोयत्याने तरुणावर वार; बिबवेवाडीत पसरवली दहशत