Pune Yerawada Crime | पुणे : शिवीगाळ करुन महिलेच्या घरात घुसून कोयत्याने तोडफोड, अल्पवयीन मुलीसोबत अश्लील बोलून गैरवर्तन; आरोपी गजाआड

Molestation Case

पुणे :  Pune Yerawada Crime | महिलेच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. घरात जबरदस्तीने घुसून हातातील कोयत्याने खिडक्यांच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच महिलेच्या अल्पवयीन मुलीला अश्लील बोलून विनयभंग केला (Molestation Case ). याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) एका तरुणावर पोक्सो अॅक्ट (POCSO Act) सह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.18) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथे घडला आहे.(Pune Yerawada Crime)

याबाबत 50 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि.19) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शाहरुख उर्फ लाला शाहीद सय्यद
Shahrukh alias Lala Shahid Syyad (वय-30 रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याच्यावर आयपीसी 452, 427, 504, 506, 354 सह पोक्सो अ‍ॅक्ट, आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्य़ादी यांच्या बहिणीचा मुलगा आहे. सोमवारी रात्री फिर्यादी व त्यांची 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात असताना आरोपीने घरासमोर येऊन शिवीगाळ केली. महिलेने शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने शिरुन हातातील कोयत्याने खिडकीची काच फोडली. तसेच दरवाजावर कोयता मारुन नुकसान केले.

अचानक घडलेल्या प्रकारामुळे महिलेची अल्पवयीन मुलगी घाबरली. आरोपीने मुलीचा हात पकडून तिच्यासोबत अश्लील बोलून तिच्या स्त्रि मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच फिर्यादी यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.
महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो सह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) आशालता खापरे (PI Ashalata Khapre) करीत आहेत.

Suicide In Katraj Dam Pune | कात्रज तलावात तरुणीची उडी मारुन आत्महत्या