Pune Water Supply | गुरुवारी पुण्यातील पाणीपुरवठा बंद राहणार
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Water Supply | गुरुवारी (दि. 2) पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. लष्कर (Lashkar), पर्वती (Parvati), एस. एन. डी. टी/वारजे (SNDT / Warje), नवीन व जुने होळकर जलकेंद्र (New and Old Holkar Water Stations) च्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि.3) कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणी पुरवठा विभागाने (PMC Water Supply Department) ही माहिती दिली आहे. (Water supply to be cut off in most parts of Pune city on Thursday)
कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार ? (Pune Water Supply)
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपींग)
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरुड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं. 42, 46 (कोंढवा खुर्द), पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.
लष्कर जलकेंद्र पंपींग भाग
लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी
चतु:श्रृंगी/एस. एन. डी. टी/वारजे जलकेंद्र परीसर
भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय – वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरुड, डेक्कन जिमखाना, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाळूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीनगर, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकात नाका, शिवाजीनगर, भोसले नगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, संगमवाडी, भांडारकर रोड.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र
मुळा रोड, खडकी, MES, HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
Web Title :- Pune Water Supply | Water supply to be cut off in most parts of Pune city on Thursday
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
UPI 123Pay | ‘हे’ नंबर मोठ्या कामाचे, इंटरनेटची गरज नाही; एका कॉलने करू शकता यूपीआय पेमेंट
Pune Pimpri Crime | रस्त्यावर पट्टे मारणाऱ्या 5 कामगारांना ट्रकची धडक, एकाचा मृत्यू 4 गंभीर जखमी
Comments are closed.