मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) महिला नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना पुढील 24 तासात जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली आहे. या धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे.
रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना धमकी देण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाचा पदभार स्विकारल्यानंतर अनेक कामे केली आहेत. राज्यातील महिलांच्या बाबत घडणाऱ्या घडामोडींवर त्यांनी लगेच दखल घेतली आहे. अशातच त्यांना जीवे मारण्याची धमकीचा फोन आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याआधीही त्यांना धमकीचे फोन आलेले आहेत.
रुपाली चाकणकर या महिलांच्या प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची खंबीर बाजू मांडत विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रावादी महिला प्रदेशाध्यक्ष पदावर असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरून संघटन मजबूत करण्यावर भर दिला. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
Web Title :- Rupali Chakankar | Maharashtra state womens commission chairperson and ncp leader rupali chakankar receives death threats
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Pune Water Supply | गुरुवारी पुण्यातील पाणीपुरवठा बंद राहणार
UPI 123Pay | ‘हे’ नंबर मोठ्या कामाचे, इंटरनेटची गरज नाही; एका कॉलने करू शकता यूपीआय पेमेंट
Pune Pimpri Crime | रस्त्यावर पट्टे मारणाऱ्या 5 कामगारांना ट्रकची धडक, एकाचा मृत्यू 4 गंभीर जखमी