पुणे : बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 45 वर्षावरील सर्वांना मोफत लसी दिली जात आहे. आता 1 मे पासून 18 वर्षावरील सर्व वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 34 ड चे नगरसेवक श्रीकांत जगताप यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देऊन सात ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे.
श्रीकांत जगताप यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे पासून 18 वर्षा पुढील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. सद्यपरिस्थितीत प्रभाग 34 ड मध्ये एकाच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु आहे. 1 मे पासून पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात नगारिकांची लसीकरणासाठी उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे या भागता 7 ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र सुरु करावीत अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
या 7 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी
1. पुणे मनपा शाळा क्र.168 बी हणमंतराव गणपतराव जगताप पाटील शाळा, हिंगणे खुर्द
2. लक्ष्मी माता मंदिर, महादेव नगर वसाहत, हिंगणे खुर्द
3. शशितारा प्रतिष्ठान कार्यालय, साईनगर वसाहत, हिंगणे खुर्द
4. कै. रमेश वांजळे जलतरण तलाव, सनसिटी रोडे, आनंद नगर
5. सनसिटी रोड येथील मनपाची भाजी मंडई
6. श्री शरदचंद्र पवार ई-लर्निंग स्कूल, गोयल गंगा, वडगाव
7. तुकाई नगर वसाहत येथील बहुद्देशीय हॉल, वडगाव बुद्रुक