बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवड्यात सुरू केलेल्या तात्पुरत्या कारागृहात(Yerwada temporary jail) दोन कैद्यांत किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. आता तात्पुरत्या कारागृहात देखील वादावादी होत असल्याचे दिसत आहे.
तेजस तुकाराम येनपुरे (वय 19 ) असे या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सोहेल इसाक शेख (वय १९ ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सत्वशिल पाटील (वय ३०, रा. जेल वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस व सोहेल येरवड्यातील तात्पुरत्या कारागृहात बंदीवान आहेत.
त्यांना एकाच खोलीत ठेवण्यात आले होते. दोन दिवसांपुर्वी रात्री साडेनउच्या सुमारास सोहेलने तेजसला तू गुन्हा कसा केलास याबाबतची माहिती विचारली. त्यावेळीे तेजसने सोहेलला माहिती दिली. मात्र, तू खोटे बोलत आहे, असा आरोप सोहेलने केल्यामुळे तेजसने त्याला मारहाण करुन जेवण करण्याच्या थाळीने सोहेलचे डोके फोडले आहे. अधिक तपास येेेरवडा पोलीस करत आहेत.