पुणे : बहुजननामा ऑनलाईन – होणाऱ्या पत्नीसह मुंबईला जाण्यासाठी स्वारगेट (swargate) चौकात थांबलेल्या तरुणाला दोघांनी अश्लील शिवीगाळ करत डोक्यात दगड घालून लुटल्याचा प्रकार घडला आहे. पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
याप्रकरणी जावेद रहेमान खान (वय 34, रा. भवानी पेठ) व अरबाज अफजल पठाण (वय 23) यांना अटक केली आहे. याबाबत पंकज कसबे (वय 26) या तरुणाने स्वारगेट swargate पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण दत्तवाडी परिसरात राहतो. त्याचा विवाह ठरला आहे. दरम्यान, मुंबईत नातेवाईकांकडे हळदीचा कार्यक्रम होता. यामुळे तो गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नटराज हॉटेलजवळ होणाऱ्या पत्नीला सोबत मुंबईला जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेला होता. यावेळी दोघेजण त्याच्याजवळ आले. त्यांनी ‘मै तेरेको पेहचांता हु, तुझ्यासोबत कोण कोण आहे’ अशी विचारणा करत शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्ययास सुरुवात केली. तसेच, डोक्यात दगड घालून 15 हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.