Pune Shivaji Nagar Crime | पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणीसोबत अश्लील वर्तन, पुण्यातील ज्ञानेश्वर पादुका चौकातील घटना
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Shivaji Nagar Crime | मित्राची वाट पहात उभ्या असलेल्या तरुणीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरुन आलेल्या एका व्यक्तीने अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन विनयभंग केला (Molestation Case). हा प्रकार पुण्यातील ज्ञानेश्वर पादुका चौकातील (Dnyaneshwar Paduka Chowk) भारत पेट्रोलपंपाच्या समोर मंगळवारी (दि.19) दुपारी दीडच्या सुमारास घडला आहे.(Pune Shivaji Nagar Crime)
याबाबत सांगवी येथे राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील एका अनोळखी व्यक्ती विरोधात आयपीसी 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मित्राची वाट पाहत उभी होती. त्यावेळी दुचाकीवरुन एक व्यक्ती तिच्याजवळ आला.
दुचाकीवरील व्यक्तीने पीडित तरुणीकडे पुणे स्टेशनकडे (Pune Railway Station) कसे जायचे असे विचारले.
आरोपीने तरुणीसोबत बोलता बोलता अचानक तिच्यासोबत अश्लील वर्तन केले.
त्यानंतर तो दुचाकीवरुन भरधाव वेगात कृषी महाविद्यालयाच्या दिशेने पळून गेला.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे पीडित मुलीला धक्का बसला. त्यानंतर तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत
फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन घेत आरोपीचा शोध सुरु केला आहे.
Pune Sinhagad Road Murder Case | पुणे : गैरसमजातून 9 वीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने खून
Comments are closed.