Pune Rural Police – Chandrakant Patil | पुणे : पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करू – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Pune Rural Police - Chandrakant Patil | Pune: We will provide more funds for the modernization of the police force - Guardian Minister Chandrakantada Patil

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Rural Police – Chandrakant Patil | पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी (Modernization Of Police Force) जिल्हा नियोजन समितीतून (District Planning Committee Pune) तसेच कंपन्यांचे सामाजिक दायित्व (सीएसआर) Corporate Social Responsibility (CSR) निधीतून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. (Pune Rural Police – Chandrakant Patil)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय (HQ Pune Rural Police) येथे ग्रामीण पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेल्या पोलीस वाहनांच्या हस्तांतरण कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी (IPS Sunil Phulari), पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल (IPS Ankit Goyal), अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte) आदी उपस्थित होते. (Pune Rural Police – Chandrakant Patil)

 

देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदल आणि पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी अधिकाधिक खर्च केला पाहिजे, असे विचार व्यक्त करुन पाटील म्हणाले, गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी पोलीस विभाग अद्ययावत करण्यासाठी डीपीडीसीतून (DPDC Pune) भरीव निधी देण्यात येईल. त्यातून केवळ वाहनेच नव्हे तर अत्याधुनिक साधनसामुग्री, सायबर गुन्ह्यांची (Cyber Crime) उकल करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर, सीसीटीव्ही यंत्रणा (CCTV) आदींवर भर देण्यात यावा. पोलीसांची निवासस्थाने, कार्यालयांचे अद्ययावतीकरण यासाठीदेखील निधी देऊ. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण आदींसाठी पोलीस दलानेही पोलीस कल्याण निधी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

 

यावेळी गोयल यांनी प्रास्ताविकात पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. जिल्हा नियोजन समितीतून दिलेल्या २ कोटी रुपयांच्या निधीतून पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी ९ स्कॉर्पिओ व ९ बोलेरो अशी १८ चारचाकी वाहने आणि ६ मोटारसायकल घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

या वाहनांचे हस्तांतरण तसेच तयार करण्यात आलेल्या नवीन टेनिस कोर्टचे (Tennis Court Pune SP Office) उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :   Pune Rural Police – Chandrakant Patil | Pune: We will provide more funds for the modernization of the police force – Guardian Minister Chandrakantada Patil

 

हे देखील वाचा :

National Lok Adalat In Pune District | पुणे : लोकन्यायालयाद्वारे प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा महाराष्ट्रात सलग दहाव्यांदा प्रथम स्थानी

Maharashtra Din In Pune | महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन; पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वारजे पोलिस स्टेशन – आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून 86 लाखांची फसवणूक करणारा अटकेत