पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे पोलिसांनी (Pune police) शहरातील रिक्षाचालकांसाठी ‘माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा 2021’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनच्या (lashkar police station) वतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांत रिक्षाचालकांवर (Rickshaw) गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा या हेतूने पुणे पोलिसांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. मात्र, आता पुणे पोलिसांच्या या स्पर्धेला रिक्षावाला संघटनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संघटनेकडून पोलिसांसाठीच तब्बल एक कोटी रुपये बक्षिस असणारी अनोखी स्पर्धा आयोजित (1 crore prize competition for pune police) केली आहे.
लष्कर पोलिसांनी (lashkar police) आयोजित केलेल्या स्पर्धेचा निषेध म्हणून ‘पोलीस ठाणे, प्रामाणिक पोलीस ठाणे’ (Pune Police) अशी विडंबनात्मक स्पर्धा ‘बघतोय रिक्षावाला फोरम’ राबवत आहे. शहरातील ज्या पोलीस ठाण्यात फायनान्स कंपन्यांच्या (finance companies) गुंडागर्दी विरोधात तक्रारी झाल्या असतील अशा पोलीस ठाण्यांचा गौरव आम्ही करणार आहोत.
असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर (Dr. Keshav Kshirsagar) यांनी सांगितले.
पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत पोलिसांनी पोलिसांचं काम करावं व रिक्षावाल्यांची प्रतिमा स्पर्धा घेऊन खराब करु नये, असेही क्षिरसागर यांनी म्हटले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
डॉ. क्षीरसागर म्हणाले, पुणे पोलिसांनी शहरातील रिक्षाचालकांसाठी स्पर्धा घेऊन त्यांची प्रतिमा मलीन करत असल्याचे दिसत आहे.
पुणे पोलिसांनी फायनान्स कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली आहे.
माहितीच्या अधिकारात पुणे पोलीस आयुक्त (Pune CP) आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त (Pimpri Chinchwad CP) कार्यालयाने माहिती दिली आहे.
फायनान्स कंपनीविरुद्ध पोलीस गुन्हे का दाखल करत नाहीत, म्हणून ही स्पर्धा आम्हाला घ्यावी लागत असल्याचे त्यांनी म्हटले.
Web Title : Pune police | Rickshaw pullers’ response to police competition, 1 crore prize competition organized for police
Jalgaon Politician | कट्टर विरोधक नेते पुन्हा एकत्र; जळगावकरांना बसला आश्चर्याचा धक्का
Pune Police-PMC | पोलिस आणि पालिकेने एकत्रित काम करण्याची गरज – पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता