पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police | घराचे इंटेरियर डेकोरेशनचं (Interior Decoration) काम व्यवस्थित झाले नाही म्हणून पुणे पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकाने इंटेरियर डेकोरेटरच्या कानाखाली पिस्तूल (Pistol) लावले. तसेच दिलेले पैसे परत मागितल्या प्रकरणी समर्थ वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Police Inspector Rajesh Puranik) यांच्यावर यापुर्वीच समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आता आणखी एका प्रकरणात राजेश पुराणिक यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पुणे पोलीस (Pune Police) दलात खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विश्वास नामदेव जाधव (वय-48 रा.300, भवानी पेठ पुणे) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विश्वास जाधव यांच्या फिर्यादीवरुन समर्थ वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यावर 323,504,506,427 प्रमाणे सोमवारी (दि. 9) समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा तन्मय हा सोमवारी सकाळी साडे आकराच्या सुमारास नाना पेठेत (Nana Pethat) समान आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याची अॅक्टिव्हा (एमएच 12 क्यु.एक्स 4310) वाहतुक पोलिसांनी उचलून नेली. तक्रारदार हे समर्थ वाहतूक विभागात गाडी सोडवण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांना विनाकारण गाडी उचलून आणल्याबाबत विचारणा करुन मदत करण्याची विनंती केली.
त्यावेळी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने तन्मयने शिवी दिल्याची खोटी माहिती पुराणिक यांना दिली.
याचा राग आल्याने पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी मुलगा तन्मय आणि तक्रारदार यांना शिवीगाळ करुन दमदाटी करत मारहाण केली.
तसेच मुलाच्या मोबाईलच्या स्क्रिनचे नुकसान करुन खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली,
असे फिर्यादी यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.
Web Title :- pune police | one more fir against police inspector rajesh puranik in samarth police station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
IPCC Report | आगामी काही वर्षात मुंबईसह 12 शहरांना मोठा धोका? ‘या’ रिपोर्टनुसार धक्कादायक खुलासा