पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police MPDA Action | वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार ऋषिकेश केदारी याच्यावर एमपीडीए कायद्या नुसार (MPDA Act) स्थानबद्धतेची (Pune Police MPDA Action) कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची 73 वी कारवाई केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार ऋषिकेश शंकर केदारी (वय-21 रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहेत. ऋषीकेश केदारी याला एमपीडीए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे.
ऋषिकेश केदारी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्याने त्याच्या साथीदारांसह वारजे माळवाडी
पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता, तलवार, चाकू यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न
(Attempted Murder), दुखापत, चोरी, खंडणी (Extortion) बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे (FIR)
केले आहेत. मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध 4 गुन्हे दाखल आहेत.
ऋषीकेश केदारी याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत (Pune Police MPDA Action) कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे
शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन
पोलीस आयुक्तांनी ऋषिकेश केदारी याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे
आदेश दिले आहेत.
ही कारवाई वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर (Sr PI Sunil Jaitapurkar),
गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे (Crime Branch P.C.B.) वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे (Sr PI Chandrakant Bedre),
पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.
- Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर भावासह तिघांनी केला बलात्कार
- Pune Pimpri Chinchwad Crime News | नुकसान भरपाई मागितल्याच्या रागातून तरुणीचा भररस्त्यात विनयभंग, पुण्यातील निलायम ब्रीज येथील प्रकार
- Pune Pimpri Chinchwad Crime News | महिलेला अश्लील शिवीगाळ करुन पतीला मारण्याची धमकी, पुणे कॅम्पमधील प्रकार