पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police MPDA Action | भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार सागर संदिप शर्मा उर्फ भोवते (वय-20 रा. लेक टाऊन जवळ, भारती विद्यापीठ, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 69 वी कारवाई आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सागर शर्मा उर्फ भोवते हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार यासारख्या हत्यारांसह जबरी चोरी, पळवून नेणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताला व मालमत्तेला नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे त्याच्याविरोधात तक्रार देण्यास धजावत नव्हते.
सागर शर्मा याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत Pune Police MPDA Action) कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे
शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन
पोलीस आयुक्तांनी सागर शर्मा याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail)
एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Sr. PI Vinayak Gaikwad),
गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे (Sr PI Chandrakant Bedre), पोलीस अधिकारी
व अंमलदार यांच्या पथकाने केली.