Pune Police MCOCA Action | येरवडा परिसरात दहशत माजवणाऱ्या हुसेन उर्फ सोन्या शेख याच्यासह इतर 9 जणांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 58 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | एक लाख रुपयाची खंडणीची मागणी (Extortion Case) करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तसेच येरवडा (Yerwada) परिसरात दहशत माजवणाऱ्या हुसेन उर्फ सोन्या युनुस शेख याच्यासह इतर 9 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 58 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोपी हुसेन उर्फ सोन्या शेख व रुपेश उर्फ दाद्या राजगुरु यांनी जुने भांडण मिटवण्यासाठी एक लाख रुपये खंडणीची मागणी करुन खंडणी दिली नाहीतर बघून घण्याची धमकी दिली. 30 जुलै रोजी फिर्यादी हे पत्नीला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी हुसेन उर्फ सोन्या शेख, रुपेश उर्फ दाद्या राजगुरु, अमिर उर्फ शंक्या शेख (रा. येरवडा) व त्यांचे इतर सहा ते सात साथीदारांनी फिर्यादी यांना येथील इराणी मार्केट (Irani Market) येथे खंडणी दिली नाही म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी आरोपींच्या हातात असलेली धारदार हत्यारे पाहून फिर्यादी हे घाबरुन पळून जाऊन एका चाळीतील घरात लपले. आरोपींनी घराचा दरवाजावर लाथा मारुन आराडा ओरडा करुन परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी आरोपींवर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) IPC 384, 143, 147, 148, 149, 337, 427, 504, 506 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला होता. (Pune Police MCOCA Action)
या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी वसीम हैदरअली मोगले (वय-22 रा. गेनबा लक्ष्मीनगर येरवडा), अमिर उर्फ शंक्या युनुस शेख (वय-18 रा. लक्ष्मीनगर येरवडा) यांना अटक केली आहे. तर इतर तीन आरोपी फरार असून या गुन्ह्यात 5 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
आरोपी हुसेन उर्फ सोन्या शेख याने संघटीत टोळी तयार करुन स्वत:च्या व टोळीच्या वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहे. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, घरफोडी करणे, शासकीय नोकरदार यांना शासकीय कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण करणे, खंडणी मागणे, शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.
येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी
परिमंडळ-4 पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांच्या मार्फत
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे,
येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम
(Sr PI Balkrushna Kadam), पोलीस निरीक्षक गुन्हे कांचन जाधव (PI Kanchan Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक रविंद्रकुमार वारंगुळे, पोलीस अंमलदार सचिन माळी, सचिन शिंदे, प्रकाश चौधरी, देविदास वांढरे
यांच्या पथकाने केली.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध
गुन्हे करणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार यासारख्या कारवाया
केल्या आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया केल्या जणार आहेत.
पोलीस आयुक्तांनी आज पर्यंत पुणे शहरातील 58 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.
Comments are closed.