Pune Police Inspector Transfers | पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकाचा समावेश

Pune Police Inspector Transfers

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfers | पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी शहरातील 3 पोलीस निरीक्षकांचा अंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचा समावेश आहे. (Pune Police Inspector Transfers)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक विनायक दौलतराव गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad) यांची भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली केली आहे. तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय गणपतराव कुंभार (Sr PI Vijay Kumbhar) यांची विशेष शाखेत (Pune Police Special Branch) पोलीस निरीक्षकपदी बदली केली आहे. (Pune Police Inspector Transfers)

बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या (Bundgarden Police Station) पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी अनिल सातपुते
(PI Ashwini Satpute) यांची अंमली पदार्थ विरोधी पथक १ च्या पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.