पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | एखाद्या पुणेकराला पत्ता विचारल्यानंतर आलेले विचित्र अनुभव लोक नेहमीच एकमेकांना सांगत असतात. शिवाय, पुणेकरांच्या ‘पुणेरी पाट्या’ तर ‘जगात भारी’ असतात. खरं तर पुण्यात जे-जे काही आहे ते सर्व जगात भारी, असल्याचे पुणेकर नेहमीच मोठ्या अभिमानाने सांगतात. (Good Wishes Message To Pune Police Inspector) आता पुणेकर पोलिसांच्या वर्दीच्या आत सुद्धा हाच पुणेकर कसा दडलेला आहे, ते समोर आले आहे. एका ज्येष्ठ पोलिसाने बदली झालेल्या आपल्या साहेबाला दिलेल्या खोचक शुभेच्छांची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. (Pune Police Inspector Transfer)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्यातील खडक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून बदली झाली. त्यानंतर खडक पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचार्याने व्हॉट्सअपवर पुणेकर स्टाईल आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही तुपासह पाच पक्वान्न खात होते. परंतु, इतरांना फक्त कोरडा भात खाऊ घालत होते! असे म्हणत या कर्मचार्याने साहेबाला त्याची चूक दाखवून दिली आहे.
या पोलीस कर्मचार्याने व्हॉट्सअप मेसेजमध्ये लिहिले आहे की, साहेब मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतच नाही, तुम्ही बदलून गेलात फार आनंद झाला, याचे पण उत्तर लगेच देतो. एक तर आपण कोणालाच रजा सुट्ट्या देत नव्हते. मी सरळ आणि प्रामाणिक काम करणारा साधा कर्मचारी होतो. पण आपली एकच भूमिका खडक पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांना अथवा अंमलदारांना तुमचा स्वभाव आवडला नाही. (Pune Police Inspector Transfer)
तुम्ही तुपासह पाचही पक्वान्न खात होते परंतु इतरांना फक्त कोरडा भात खाऊ घालत होते.
त्यामुळे माझ्यासारख्या ज्येष्ठांचा आपल्या पाठीशी कायम आशीर्वाद राहील.
आम्हाला म्हातार्या लोकांना खूप त्रास दिला त्याचा तुमच्या बायका पोरांना आशीर्वाद मिळेल.
कारण तुम्ही आम्हाला दिलेला त्रास आम्हाला झाला नसून, आमच्या बायका मुलांना झाला आहे.
तरीपण पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा साहेब.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आता या मेसेजचा स्क्रीनशॉट सर्वत्र व्हायरल होत असून यावरून पोलीस दलात सुद्धा चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे ज्या साहेबाबद्दल या कर्मचार्याने आपला राग शुभेच्छांच्या माध्यमातून पुणेकर स्टाईलने व्यक्त केला आहे, त्या साहेबांची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे.
बदली झालेल्या पोलीस अधिकार्याने या मेसेजवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,
सुट्ट्या द्यायला कधीच अडचण नसते. जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असतो तेव्हा मात्र सुट्ट्या देता येत नाहीत.
इतर वेळेला आम्ही सुट्ट्या दिल्या आहेत.
दरम्यान, यापूर्वी सुद्धा खडक पोलीस स्टेशनमधील एका कर्मचार्याने दिलेला रजेचा अर्ज चर्चेत आला होता.
या कर्मचार्याने चीलापी मासे आणायला जाण्यासाठी सुट्टी मागितली होती. ते पत्र सुद्धा व्हायरल झाले होते.
Web Title :- Pune Police Inspector Transfer | Punekar police also ‘great in the world’; ‘Puneri style’ greetings to the transferred police inspector, WhatsApp massage went viral
हे देखील वाचा :