मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – MNS – BJP | आगामी महापालिका निवडणुकीत (Maharashtra Municipal Elections 2022) भाजपा-मनसे (MNS – BJP) एकत्र येणार असल्याच्या हालचाली दिसत असतानाच मनसेने स्वबळाची घोषणा दिली आहे. लवकरच राज ठाकरे (Raj Thackeray) विदर्भ दौरा करणार असून त्यावेळी मनसेची भूमिका आणखी स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी मनसेच्या नेत्यांनी भाजपाविरूद्ध तोफ डागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आतापर्यंत अनेक वर्षे नागपूरात सत्तेत असलेला भाजपा आणि नागपूरची झालेली अवस्था, यावर आता लोकांनी विचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना आता नवीन लोकांना संधी द्यायची आहे. येथील नागरिक जून्या लोकांना कंटाळले आहेत, असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नागपुरातच दंड थोपटले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे विदर्भ दौरा करणार आहेत. 19 रोजी दुपारी 4 वाजता ते चंद्रपूरसाठी रवाना होतील. चंद्रपूरची बैठक आटोपून 20 रोजी दुपारी 4 वाजता ते अमरावतीला रवाना होतील. अमरावतीला 21 रोजी संघटनात्मक आढावा होईल. 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी रेल्वेने मुंबईला रवाना होतील. राज ठाकरे यांच्या या दौर्याचे नियोजनाची पाहणी करण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी देखील उपस्थित होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (MNS – BJP)
संदीप देशपांडे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला या महापालिकेच्या निवडणुका देखील पूर्ण ताकदीने लढवणार आहे. आतापर्यंत राज ठाकरे यांनी विदर्भाकडे विशेष लक्ष दिले नव्हते. त्यांनी 2014 मध्ये पश्चिम नागपुरात जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर 2019 विधानसभा निवडणुकीत ते नागपूर मार्गे वणी येथे प्रचारासाठी गेले होते. आता 18 सप्टेंबर रोजी सकाळी नागपुरात आगमन झाल्यावर राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा करतील. रात्री इतर पक्षातील काही प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
Web Title: MNS – BJP | Devendra Fadnavis fined by MNS in Nagpur; MNS leader said – ‘People are tired of BJP now’
हे देखील वाचा :