पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police Crime News | लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळ येथे अल्पवयीन मुलास पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे (Police Sub Inspector Vaibhav More) यांनी बेदम मारहाण (Marhan) केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी संतोष बाबुराव भोसले (Santosh Baburao Bhosale) यांनी केला आहे. त्याबाबत भोसले यांनी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या (Loni Kalbhor Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे (Senior Police Inspector) तक्रार देखील केली आहे. दरम्यान, दि. 16 मे 2023 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या प्रकाराचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल (Video Viral ON Social Media) होत आहे. (Pune Police Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 16 मे रोजी संतोष भोसले यांचा वाढदिवस होता.
मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास संतोष भोसले हे त्यांच्या घरासमोर पुतण्या शिवराज भोसले आणि
इतर जणांसोबत वाढदिवसानिमित्त केक कापत होते. त्यावेळी अचानक पीएसआय वैभव मोरे (PSI Vaibhav More)
आणि त्यांचे इतर सहकारी (Pune Police) त्या ठिकाणी आले. त्यांनी अचानक लाठीमार (Lathimar)
करण्यास सुरूवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी शिवीगाळ केल्याचेही भोसले यांचे म्हणणे आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी केलेल्या मारहाणीत शिवराज भोसले (17) याच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेचा भोसले यांनी तीव्र निषेध केला असून संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी असे
देखील तक्रार अर्जामध्ये म्हंटले आहे. दरम्यान, घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Web Title : Pune Police Crime News | Citizens allege brutal beating by PSI Vaibhav More of Loni Kalbhor Police Station (VIDEO)