पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-2 च्या पथकाने (Anti Dacoity Cell Pune) एका सराईत वाहन चोरटयास अटक करून त्याच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून 2 लाख 15 हजार रूपये किंमतीच्या 7 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (Pune Police Crime Branch News)
वरूणराज कावरे Varunraj Kavre (25, रा. पंढरपूर – Pandharpur) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-2 मधील पोलिस अंमलदार हे हडपसर पोलिस स्टेशन (Hadapsar Police Station) आणि वानवडी पोलिस स्टेशनच्या (Wanvadi Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस नाईक शिवाजी जाधव (Police Shivaji Jadhav) यांना एकजण हडपसर परिसरातील माळवाडी (Malwadi Hadapsar Pune) येथे थांबला असुन तो चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी आलेला आहे अशी माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचुन पोलिस पथकाने कावरेला अटक केली. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याच्याकडून हडपसरमधील 2, मुंढवा पोलिस स्टेशन (Mundhwa Police Station), चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन (Chaturshringi Police Station), फरासखाना पोलिस स्टेशन (Faraskhana Police Station), लोणीकंद पोलिस स्टेशन (Lonikand Police Station) आणि सांगोला पोलिस स्टेशन मधील (Sangola Police Station) प्रत्येक 1 असे एकुण 7 गुन्हे उघडकीस आले. (Pune Police Crime Branch News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पंधरकर (Sr PI Sunil Pandharkar), पोलिस अंमलदार राजेश अभंगे, अशोक आटोळे, दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव, सुदेश सपकाळ, विक्रांत सासवडकर आणि राहुल इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title :- Pune Police Crime Branch News | 7 Crimes Revealed by Anti-Robbery and Vehicle Theft Squad-2
हे देखील वाचा :
Maharashtra Politics News | ‘मविआचे नेते शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, हे जबाबदारीने सांगतोय’