पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत एमजीएम क्रिकेट अॅकॅडमी आणि गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत पहिला विजय नोंदविला. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
येवलेवाडी येथील बापूसाहेब शेलार क्रिकेट (ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अॅकॅडमी) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कुलवंश वाकोडे याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमीने एके स्पोर्टस् क्रिकेट अॅकॅडमीचा ६ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एके स्पोर्टस् क्रिकेट अॅकॅडमी संघाचा डाव ७५ धावांवर गडगडला. कुलवंश वाकोडे याने (३-१५) चमकदार गोलंदाजी केली. हे आव्हान गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमीने १५.२ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. कुलवंश वाकोडे (३० धावा) आणि अर्जुन दिड्डी (१३ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाचा विजय सोपा केला. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)
स्वरीत धरक याच्या ६० धावांच्या जोरावर एमजीएम क्रिकेट अॅकॅडमीने स्पेशलाईज्ड क्रिकेट अॅकॅडमीचा ४६ धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी एमजीएम क्रिकेट अॅकॅडमीने १७० धावांचे आव्हान उभे केले. स्वरीत दरक याने ५० चेंडूत ७ चौकारांसह ६० धावांची खेळी केली. याशिवाय सोहम गिरी (३१ धावा) आणि जीवन वरदे (नाबाद ३० धावा) यांनी दुसर्या बाजूने साथ दिली. या आव्हानाला उत्तर देताना स्पेशलाईज्ड क्रिकेट अॅकॅडमीचा डाव १२६ धावा मार्यदित राहीला. अर्जुन थोरात याने नाबाद ५९ धावांची तर, आयुश कुंभारकर याने ३६ धावांची खेळी केली. पण विजय संघापासून ४६ धावांनी दूर राहीला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एके स्पोर्टस् क्रिकेट अॅकॅडमीः २० षटकात ८ गडी बाद ७५ धावा (सोहम सावंत १८, पृथ्वीराज खांडवे १५, कुलवंश वाकोडे
३-१५) पराभूत वि. गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमीः १५.२ षटकात ४ गडी बाद ७९ धावा
(कुलवंश वाकोडे ३०, अर्जुन दिड्डी १३, अर्थव आखाडे १-१३); सामनावीरः कुलवंश वाकोडे;
एमजीएम क्रिकेट अॅकॅडमीः २० षटकात २ गडी बाद १७० धावा (स्वरीत दरक ६० (५०, ७ चौकार), सोहम गिरी ३१,
जीवन वरदे नाबाद ३०);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी स्वरीत आणि सोहम ९० (८४); दुसर्या गड्यासाठी
स्वरीत आणि जीवन ५८ (२६) वि.वि. स्पेशलाईज्ड क्रिकेट अॅकॅडमीः २० षटकात ३ गडी बाद १२६ धावा
(अर्जुन थोरात नाबाद ५९ (५७, ९ चौकार) आयुश कुंभारकर ३६, ऋषभ वर्मा १-१६); सामनावीरः स्वरीत धरक;
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘Pay Fair Trophy’ Championship Under 13 Children’s Cricket Tournament! First win for MGM Cricket Academy, Gary Kirsten Cricket Academy Teams !!
हे देखील वाचा :
Maharashtra Politics News | ‘मविआचे नेते शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, हे जबाबदारीने सांगतोय’