पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | भोसरीमध्ये एका व्यावसायिक महिलेच्या (Professional Woman) गळ्यावर वार करत खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना भोसरी येथे सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. पूजा देवी प्रसाद Pooja Devi Prasad (वय-32) असं खून झालेल्या व्यावसायिक महिलेचे नाव आहे. मयत पुजाचं ‘प्रगती कलेक्शन’ नावाचं दुकान आहे. तिथच आज सकाळी ही घटना घडली असून घटनेनंतर आरोपी (Pune Pimpri Crime) फरार झाला आहे.
या प्रकरणाची भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) नोंद करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनूसार, आज सकाळी पूजाने साडेनऊच्या सुमारास दुकान उघडलं. दुकानातील साफसफाई केली. काही वेळातच अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश करत पूजाच्या गळ्यावर चाकूने वार (Stab with a Knife) केले. त्यांच्यात झटापट झाली, पूजाने हल्ला केलेल्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्नही केला, दुकानाबाहेर काही अंतर पाठलाग केला. (Pune Pimpri Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काही अंतरावर गेल्यावर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने पूजा रस्त्यावर कोसळल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषीत केले. महिलेच्या खूनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. मयत पूजाचं कुटुंब मागील 20 ते 25 वर्षे भोसरी परिसरात राहत आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
Web Title : – Pune Pimpri Crime | Woman businessman killed by stabbing her neck in Bhosari accused absconding
हे देखील वाचा :
Cholesterol Sudden Increase | ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, जीवासाठी धोका
IRCTC Dividend | इन्व्हेस्टर्सला भेट देणार आयआरसीटीसी, आता मिळेल 75 टक्के डिव्हिडंट
Supriya Sule | ‘बायको जेवढी रुसून बसत नसेल, तेवढे हे मंत्री रुसत आहेत’ – सुप्रिया सुळे