पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन –Pune Pimpri Crime News | लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitute Racket) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात महिलेला पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी (PCPC Police) दोघांना अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई साईनगरी येथील अगत्य लॉज येथे बुधवारी (दि.29) रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली आहे. (Pune Pimpri Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लॉज मॅनेजर अजय रमेश रणदिवे (वय-25 रा. साई मंदिराजवळ, वडमुखवाडी), अजय दत्ता हरणे (वय-25 रा. सावरी ता. निलंगा, जि. लातुर) यांना अटक केली आहे. तर संजय पवळे याच्यावर आयपीसी 370 (3) 34 सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत सोमनाथ बाळु खळसोडे यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रणदिवे आणि हरणे या दोघांनी एका महिलेला पैशाचे आमिष दाखवून
तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला. यातून मिळणाऱ्या पैशावर दोघांनी आपली उपजीविका भागवली.
याप्रकरणी माहिती मिळताच दिघी पोलिसांनी अगत्य लॉजवर छापा मारुन कारवाई केली. यामध्ये एका महिलेची सुटका
करुन दोघांना अटक केली. तसेच 8 हजार 940 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक वाघमोडे (PI Waghmode) करीत आहेत.
- Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
- ACB Trap News | एक लाखाची लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Motion Sickness Remedies | तुम्हाला सुद्धा प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उलटीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय करा..
- Cracked Heels Remedies | टाचांना खूप भेगा पडल्या? मऊ मुलायम टाचांसाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय