पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | कामाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या महिलेला दोन भावांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच महिलेचे कपडे फाडून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी दोन भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) पिंपरी गावात गुरुवारी (दि.1) सकाळी दहाच्या सुमारास घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 46 वर्षांच्या महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी विनोद किसनचंद मतानी (वय 42), सुनील किसनचंद मतानी (वय 45, दोघे रा. पिंपरी गाव, पिंपरी) यांच्यावर आयपीसी 354, 294, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या कामाचे पैसे घेण्यासाठी गुरुवारी सकाळी दहा वाजता आरोपींच्या घरी गेल्या होत्या.
फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली असता, आरोपी विनोद मतानी व
सुनील मतानी यांनी फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा भाषेत शिवीगाळ केली.
तसेच विनोद मतानी फिर्यादींच्या अंगावर धावून गेला व त्याने फिर्यादी यांच्या अंगावर
हात टाकत त्यांचे कपडे फाडत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
हा सर्व प्रकार फिर्यादी यांच्या नणंद यांच्यासमोर झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. सूर्यवंशी करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | A woman was beaten by obscene abuse for asking for money for work; FIR against two brothers
हे देखील वाचा :
Ajit Pawar | ‘राज ठाकरेंचा आरोप धादांत बिनबुडाचा, माणसाने एवढे दुटप्पी वागू नये’ – अजित पवार
Pune Pimpri Crime | कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत महिलेचा केला विनयभंग