तळेगाव दाभाडे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | तळेगाव दाभाडे येथे ऑनलाइन जंगली रमीमध्ये (Online Junglee Rummy) वीस हजार हरल्याने एका तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Committed Suicide) केली. गणेश सोमनाथ काळदंते (Ganesh Somnath Kaldante) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा कॅब चालक (Cab Driver) असून त्याची स्वत:ची गाडी आहे. गणेशला ऑनलाइन जंगली रमी खेळण्याचे व्यसन लागले होते, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कमी वेळेत आणि कमी कष्टात जास्त पैसे कमवण्याच्या नादात अनेक जण ऑनलाइन गेमला बळी पडत आहेत. मोबाईलमध्ये पैसे कमावण्यासाठी अनेक ऑनलाइन गेमचे आमिष दाखवले जाते. अशाच जंगली रमी खेळणाऱ्या गणेशने रमीमध्ये पैसे हरल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश हा कॅब चालवून आपला संसार चालवत होता. त्याला रमी व्यतीरिक्त दारु पिण्याचे व्यसन (Alcoholism) होते, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे (Talegaon Dabhade Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने (Senior PI Satyawan Mane) यांनी दिली.
रविवारी घरामध्ये सर्वजण असताना गणेशने घराच्या बेडरुमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
रात्री गणेश बाहेर न आल्याने दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही.
त्यामुळे घरच्यांनी बेडरुमचा दरवाजा तोडला असता गणेशने आत्महत्या केल्याचे दिसले.
गणेश हा सतत मोबाईलमध्ये असायचा अशी माहिती मिळत आहे. जंगली रमीमध्ये वीस हजार हरल्याने त्याने टोकाचे पाऊल उचललं,
असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime News | young man committed suicide by
hanging himself after losing 20 thousand rupees in Junglee rummy in pune