तळेगाव दाभाडे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मुलींच्या स्वच्छतागृहात (Girls Washroom) व्यवस्थापनाने सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार आंबी कॅम्पसमधील (Ambi Campus) डॉ. डी.वाय. पाटील शाळेत (Dr. D.Y. Patil school) घडला आहे. एवढेच नाहीतर विद्यर्थ्यांना ठराविक धर्माची प्रार्थना म्हणायला लावत असल्याचा आरोप करत शाळेच्या मुख्याध्यापकाला (Principal) बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी शर्ट फाटेपर्य़ंत बेदम चोप दिला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
कोट्स अलेक्झांडर (Coates Alexander) असे बेदम माराहण करण्यात आलेल्या मुख्यध्यापकाचे नाव आहे. शाळेच्या आवारात पालकांनी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकाला पळवून-पळवून मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि.4) घडला आहे. याप्रकरणी मुख्यध्यापक अलेक्झांडर याच्याविरुद्ध तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police Station) लेखी तक्रार देण्यात आली आहे. अलेक्झांडर यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आंबी येथील डॉ. डी.वाय पाटील कॅम्पसमध्ये विविध विभागांची कॉलेज आणि शाळा आहेत. या शाळेच्या स्वच्छतागृहातील बेसिन, आरसे, लाईटची बटणे वारंवार तोडली जात आहेत. नुकसान केले जात आहे. त्यामुळे स्वच्छतागृहातील बेसिन असलेल्या परिसरात व्यवस्थापनाने (School Management) दीड महिन्यांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता.
परंतु, मुख्याध्यापक अलेक्झांडर आणि विद्यार्थ्यांच्या पालाकांशी असलेले वर्तन आणि त्यामुळे होणारे वारंवार वाद यामुळे हा कॅम्पस इतर कॅम्पसच्या तुलनेत कायमच चर्चेत राहिला आहे. पहिली ते दहावीच्या शाळेचे मुख्यध्यापक असणाऱ्या अलेक्झांडर यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या पुस्तकात एक प्रर्थना आहे. ही प्रार्थना ठराविक धर्माची असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे.
दरम्यान, पालकांनी याबाबत अलेक्झांडर यांना भेटून विचारणा केली होती. त्यावेळी जाब विचाल्यावरुन वाद झाल होता. त्यातच मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही लावल्याची बाब मावळ परिसरात पसरली. त्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आणि पालकांनी मंगळवारी शाळेत जाऊन याबाबत शाळा व्यवस्थापनाला धरले. त्यानंतर कारमधून पळून जाण्याच्या तयारीत असताना अलेक्झांडर याला शाळेच्या आवारात पळवून-पळवून मारहाण केली.
मारहाणीमध्ये अलेक्झांडर याचा शर्ट फाटला. यावेळी ‘अलेक्झांडर मुर्दाबाद’ आणि ‘ठराविक धर्माची शिकवण चालणार नाही’, अशा घोषणा देण्यात आल्या. अलेक्झांडर याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ट्विटरवर हा व्हीडिओ अपलोड करताना जय श्रीरामच्या घोषणांचे गाणे याला जोडण्यात आले आहे. या व्हिडिओवर हजारो नेटीझन्स यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, या घटनेबाबत शाळा प्रशासनाकडून पोलिसांना कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही.
Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime News | School Principle Attacked By Hindu Activists For Allegedly Asking Students To Recite Christian Prayers and Installing CCTV Cameras Inside Girls’ Toilet