पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील एका तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास स्वत: आत्महत्या करण्याची धमकी (Suicide Threats) पीडित तरुणीला दिली. याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) वसमत येथील तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत हवेली तालुक्यातील चऱ्होली बुद्रुक येथील 25 वर्षीय तरुणीने रविवारी (दि.24) लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन विश्वनाथ कुमराव काळे (वय-30 रा. वसमत जि. नांदेड) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वनाथ काळे याने तरुणीसोबत ओळख केली.
तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले.
त्यानंतर तरुणीला मोशी येथील मित्राच्या घरी, दिघी आणि डेक्कन येथील लॉजवर नेले.
तसेच हैदराबाद येथे नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Pune Rape Case) प्रस्थापित केले.
याबाबत पोलिसात तक्रार केली तर स्वत:च्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी तरुणीला दिल्याचे फिर्यादीत नमूद
केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) करीत आहेत.
- अंगावरील कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, पुण्यातील धक्कादायक प्रकार
- वाहन चोरी करणाऱ्या दोघांना चाकण पोलिसांकडून अटक, 8 लाखाच्या 15 दुचाकी जप्त
- सिनेस्टाईल पाठलाग, अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात रोड रोमियोंकडून विनयभंग; वारजे माळवाडी परिसरातील घटना
- पुण्यात दोन अल्पवयीन मुलींचा 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग
- औंध रोड, खडकी परिसरात संघटित गुन्हेगारी करणार्या मांडा टोळीवर मोक्का, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 104 टोळयांवर मोक्का
- Swargate To Katraj Metro | स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा – अजित पवार