पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची संतापजनक घटना कोंढवा परिसरात घडली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.26) सायंकाळी पाच ते सव्वापाच आणि यापूर्वी वेळोवेळी एनआयबीएम रोडवरील (NIBM Road) एका बिल्डिंगच्या समोरील मोकळ्या जागेत घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) एकावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत एका महिलेने मंगळवारी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सिद्धांत विजय जाधव Siddhant Vijay Jadhav (रा.शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) याच्यावर आयपीसी 354 (अ) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एनआयबीएम रोड वरील एका बिल्डिंगमध्ये राहते.
आरोपी जाधव मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महिलेच्या फ्लॅटच्या समोर असलेल्या मोकळ्या
जागेत आला. त्याने अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन महिलेच्या स्त्री मनास लज्जा
उत्पन होईल असे कृत्य केले. आरोपीने यापूर्वी देखील अशा प्रकारे गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे (PSI Balaji Digole) करीत आहेत.
- Nashik Police | नागरिकांकडून सूचना तसेच अभिप्राय जाणुन घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी प्रसारित केला WhatsApp नंबर
- Punit Balan Group | पुनित बालन ग्रुप ईगल्सला वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद
- Health Benefits Of Guava | थंडीत का सेवन करावा पेरू? ९९% लोक ‘खावा की खाऊ नये’ याबाबत असतात कन्फ्यूज!
- White Hair Remedies | स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थाने पांढरे केस होतील काळे, जाणून घ्या कसा उपयोग करायचा…
- Acidity Home Remedies | Acidity मुळे वाढतात पोटाच्या समस्या, ‘या’ गोष्टींचा वापर केल्याने मिळेल लगेच आराम..!
- Home Remedies For Swollen Feet | पायांची सूज होईल दूर, फक्त करा ‘हे’ 5 घरगुती उपाय…
- Anti Aging Tips | ‘या’ 5 गोष्टी हिरावून घेतात तुमचे सौंदर्य, वयाच्या 24 व्या वर्षी तुम्ही दिसता 34 सारखे.. त्यामुळे आजच करा हे उपाय…!