पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitute Business) प्रकार विमानतळ पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या कारवाईत 25 ते 30 वयोगटातील चार तरुणींची सुटका करण्यात आली असून स्पा मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना स्पा च्या नावाखाली जास्त पैशाचे अमिषा दाखवून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) स्पा मालक सतिश सकनुरे (वय-32 रा. लातूर), स्पा मॅनेजर रोषनी सुरेश पाटील (वय-34 रा. वाघोली) यांच्या विरुद्ध आयपीसी 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस उपनिरीक्षक समु रामकिशोर चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.10) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास विमाननगर परिसरातील ईस्ट कोर्ट बिल्डिंगमधील शांती स्पा येथे करण्यात आली.
विमाननगर परिसरातील ईस्ट कोर्ट बिल्डींगमधील शांती स्पा सेंटर (Shanti Spa Center) येथे वेश्या व्यवसाय
सुरु असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना समजली. त्यानुसार पोलीस पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री
करुन घेतली. त्यानंतर शांती स्पा सेंटर येथे छापा टाकून चार तरुणींना ताब्यात घेतले.
आरोपी स्पा सेंटरमध्ये पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते.
वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले.
पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.
- ACB Trap News | 5 लाखाच्या लाचेची मागणी ! फोन पे वर लाच स्वीकारताना पुण्यातील वकील अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, आरोपींचं ‘मुळशी कनेक्शन’ उघड
- Arrest In MPID-Pune Police | कोट्यावधींची फसवणूक करणार्या मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार याला अटक; MPID च्या गुन्ह्यात समर्थ पोलिसांनी केला तिसरा आरोपी अटक
- Pune Hadapsar Crime News | भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मांजरी परिसरातील प्रकार