पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | कॅबमध्ये बसलेल्या प्रवासी महिलेचा विनयभंग (Molestation Case) केल्या प्रकरणी ओला कॅब चालकाला (Ola Cab Driver) देहुरोड पोलिसांनी (Dehu Road Police) अटक केली आहे. ही घटना 14 मे रोजी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यानंतर आरोपी आपले अस्तित्व लपवून फिरत होता. अखेर देहूरोड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राहुल पांडुरंग म्हस्के Rahul Pandurang Mhaske (रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी एक महिला कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथे तिच्या मित्राच्या वाढदिवसाला जात होती. तिने ओला कॅब बुक केली. त्यानंतर महिला राहुल म्हस्के याच्या कॅब (एमएच 14 एल.बी. 4133) मधून कोरेगाव पार्क येथे जात होती. आरोपीने कार कोरेगाव पार्क येथे न नेता देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेली. त्याठिकाणी महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला आहे. याबाबत महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राहुल म्हस्के हा आपले अस्तित्व लपवून शहरात वावर होता. पोलिसांनी त्याचा तांत्रिक विश्लेषण करुन शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ओला कॅब जप्त केली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पी टी खणसे, पोलीस अंमलदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, संतोष जाधव, सुनील यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, निलेश जाधव, मोहसीन अत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्निल साबळे यांच्या पथकाने केली.