पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | घरबांधणीसाठी माहेरहून 15 लाख रुपये आणण्यास सांगून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच तिला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) ढकलून देण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार विवाहितेने केली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Pune Police) पती, सासरे आणि सासू यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 35 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) मंगळवारी (दि.19) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी पती अतुल भानुदास गुंजाळ (वय-35), सासरे भानुदास आण्णासाहेब गुंजाळ, सासु लक्ष्मी भानुदास गुंजाळ (वय-56 तिघे रा. विश्रांतवाडी) यांच्यावर आयपीसी 307, 498अ, 323, 504, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 4 मे 2022 ते 18 सप्टेंबर 2023 या कालावधीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व पती हे पतीपत्नी आहेत. आरोपींनी संनमत करुन फिर्यादी यांना घरबांधणीसाठी माहेरहून 15 लाख रुपये आणण्यास सांगून महिलेला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला.
आरोपी पती अतुल गुंजाळ याने महिलेला फ्लॅटच्या गॅलरीमधून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला.
तसेच खडकवासला धरण परिसरात फिरायला घेऊन जावून महिलेला धरणात ढकलून देण्याचा प्रयत्न करुन जीवे मारण्याचा प्रयत्न(Attempt to kill)
केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माळी (API Mali) करीत आहेत.
- सहकारनगर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 72 वी स्थानबध्दतेची कारवाई
- किरकोळ वादातून तरुणाचा खून, हडपसर पोलिसांकडून 6 जणांना अटक
- तक्रार दिल्याच्या रागातून वैदुवाडी परिसरात वाहनांची तोडफोड, हडपसर पोलिसांकडून 13 जणांना अटक
- वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने तिघांची 22 लाखांची फसवणूक, पुण्यातील प्रकार; मुंबईतील दोघांवर FIR
- जुन्या भांडणातून महिलेला अश्लील शिवीगाळ, पतीला जीवे मारण्याची धमकी; कोथरुड परिसरातील प्रकार
- पिंपरी : मोबाईल लोन करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, एकाला अटक