Pune Pimpri Chinchwad Crime News | कर्जाची रक्कम बँकेत न भरता फसवणूक, एकावर FIR; वानवडी परिसरातील प्रकार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | फ्लॅट घेण्यासाठी घेतलले कर्ज (Home Loan) फेडण्यासाठी दिलेली रक्कम कर्ज खात्यात न भरता नातेवाईकानेच फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने 7 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (Pune Police) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते 18 डिसेंबर 2023 दरम्यान घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी जालिंदर भिमराव धुमाळ Jalandar Bhimrao Dhumal (रा. शिवसागर सोसायटी, वानवडी) यांनी सोमवारी (दि.18) वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन स्वप्निल अनिल शितोळे Swapnil Anil Sitole (रा. गद्रे वाडा, सदाशिव पेठ, पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या पुतण्याचा मेहुणा आहे. फिर्यादी यांनी फ्लॅट घेण्यासाठी
बँकेकडून कर्ज काढले आहे. हे कर्ज लवकरात लवकर फेडण्यासाठी फिर्यादी यांनी स्वप्निल शितोळे याच्याकडे 7 लाख 13
हजार 590 रुपये दिले होते. मात्र त्याने पैसे फिर्यादी यांच्या बँक खात्यात न भरता स्वत:कडे ठेवून पैशांचा अपहार केला.
फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जालिंदर धुमाळ यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड (PSI Santosh Gaikwad) करीत आहेत.
- MLA Ravindra Dhangekar | रिक्षाचालक, मालक यांच्यासाठी त्वरित कल्याणकारी मंडळ स्थापन करा ! काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अधिवेशनात मांडला मुद्दा; योग्यता प्रमाणपत्राचे शुल्क माफ करण्याची सरकारकडे मागणी
- ACB Trap News | शिधापत्रिका पूर्ववत करुन देण्यासाठी लाच स्वीकारताना एकाला पुणे एसीबी कडून अटक
- Pune Police MPDA Action | खडकीमधील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 71 वी स्थानबध्दतेची कारवाई
- Gujarat High Court | दुसरा पुरुष असो किंवा पीडितेचा पती, बलात्कार हा बलात्कारच : हायकोर्ट
- Ultimate Kho Kho | अल्टीमेट खो-खो सीझन २ मध्ये मुंबई खिलाडी संघाचे नेतृत्व अनिकेत पोटे याच्या खांद्यावर
Comments are closed.