पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या युवकाच्या गाडीची काच फोडून भररस्त्यात लुटल्याची घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.17) रात्री साडे दहाच्या सुमारास बाजारमळ्याकडून लोणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत राजेश बाळासाहेब काळभोर (वय-31 रा. बाजारमळा, लोणी काळभोर, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ऋषिकेश सुरेश पवार (वय-25), गौरव सोनवणे/चंद्रकांत सोनवणे (वय-21), सागर गणपत पवार (वय-26 सर्व रा. घोरपडे वस्ती, लोणीकाळभोर) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या एका अनोळखी साथीदारावर आयपीसी 392, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ऋषिकेश पवार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळभोर हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी चारचाकी गाडीतून जात होते. बाजारमळ्याकडून लोणी गावाकडे जात असताना ओढ्याच्या अलीकडे अचानक गाडीच्या पाठीमागील काचेवर दगड मारल्याचा आवाज आला. त्यामुळे काळभोर यांनी गाडी थांबवली. त्यांनी गाडीच्या खाली उतरुन पाहिले असता बुलेट वर दोनजण दिसले. तसेच त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन आणखी दोन जण आले.
बुलेट गाडीवर ऋषिकेश पवार आणि गौरव सोनवणे होते. या दोघांनी काळभोर यांना पकडून पैसे काढून दे, नाहीतर तुला खल्लास करुन टाकतो अशी धमकी दिली. पवार याने काळभोर यांच्या खिशातून जबरदस्तीने तीन हजार रुपये काढून घेतले. तसेच त्यांच्या चारचाकी गाडीच्या चारही बाजूच्या काचांवर दगड मारुन त्या फोडल्या. त्यानंतर चौघेजण दुचाकीवरुन पळून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोरे करीत आहेत.
- Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रेयसीचा आंघोळ करतानाचा काढला व्हिडिओ, ब्रेकअप झाल्यावर केला व्हायरल; पुण्यातील धक्कादायक घटना
- Pune Mundhwa Police | खुनाच्या प्रयत्न करुन दोन महिने फरार असलेल्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Punit Balan Group (PBG) | पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटील ‘पुनीत बालन ग्रुप’शी करारबद्ध; जागतिक क्रमवारीत पाटील 6 व्या क्रमांकावर