बहुजननामा ऑनलाईन – पुणे आयुक्तालयापासून हकेच्या अंतरावर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी एकावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यात गोळी लागल्याने एकजण जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, नेमका गोळीबार कोणी केला हे समजू शकलेले नाही. तर जखमी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाजवळील एसबीआयच्या ट्रेझरीजवळ ही घटना घडली आहे.
https://www.facebook.com/
भरदिवसा गोळीबार झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्ह शाखेचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात काही चित्रण कैद झालं आहे काय याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
पुण्यात भरदिवसा गोळीबार झाल्यानंतर सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे.घटनास्थळी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पश्चिम विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्यासह अधिकारी व बंडगार्डन पोलीस दाखल झाले आहेत.दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती घटनास्थळावरील उपस्थित असलेल्या पोलिस अधिकार्यांनी दिली आहे.