बहुजननामा ऑनलाइन टीम – हाताची शस्त्रक्रिया असल्याचे सांगून गावाहून मदतीसाठी बोलावून घेतलेल्या एका तरुणीवर अत्याचार करण्यात आले.(ransom demanded) तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने फिर्याद दिली असून पोलिसांनी सुरेंद्रनाथ आवळे (रा. सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सांगली येथील 22 वर्षाच्या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रोहन याने आपल्या हाताचे ऑपरेशन असल्याची बतावणी करुन तरुणीला मदतीसाठी एप्रिल 2018 मध्ये पुण्यात बोलावून घेतले होते. आरोपीने तरुणीला त्याच्या मित्राच्या रुमवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
आरोपीने अत्याचार करताना व्हिडीओ काढला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे खंडणी मागितली. तसेच त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरीक संबंध ठेवले. पीडित तरुणीकडून जबरदस्तीने पंधरा हजार रुपये घेतले. एवढेच नाहीतर आरोपीने ही गोष्ट पोलिसांना सांगितले तर घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून तिने सांगली पोलिसांकडे फिर्याद दिली. गुन्हा पुण्यात घडला असल्याने सांगली पोलिसांनी हा गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग केला आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.