Pune News : लोहगाव परिसरातील सुरक्षा रक्षकाकडून उच्चभ्रू सोसायटीत चोरी, पोलिसांकडून त्याच्यासह तिघांना अटक

बहुजननामा ऑनलाइन टीम – लोहगाव परिसरात सुरक्षा रक्षकानेच घरफोडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर विमानतळ पोलिसांनी त्याच्यासह तिघांना अटक केली. यात 25 तोळ्यासह इतर ऐवज चोरुन नेला होता.
संतोष उर्फ लारा काशिनाथ जाधव (वय 35) त्याचा साथीदार संतोष उर्फ रोखी अरुण धनवजिर (वय 34) व चोरीचे सोने खरेदी करणारा अशोक गणेशलाल जानी (वय 54) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीचे 20 तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी सौरभ कुंदन यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील न्याती एविता या उच्चभ्रू सोसायटीत फिर्यादी राहतात. डिसेंबर रोजी ते कुटुंबीयांसोबत कात्रज या ठिकाणी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांचा फ्लॅट फोडत पंचवीस तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास विमानतळ पोलीस करत होते. यावेळी पोलिसांना संतोष जाधव याने घरफोडी केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आणखी एका साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी एका सोनारासह तिघांना अटक केली. आरोपी संतोष जाधव हा पूर्वी सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला माहिती होती.
Comments are closed.