• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

by nageshsuryavanshi
May 21, 2022
in ताज्या बातम्या, पुणे
0
Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समर्पित आयोगासमोर मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक-प्रतिनिधींनी उपस्थित राहून यासंदर्भातील भूमिका मांडली आणि लेखी निवेदनही सादर केले. (Pune News)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ११ मार्च २०२२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे “महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोग” गठीत केला आहे. (Pune News)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या आयोगाच्या कार्यकक्षेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी अभिवेदन, सूचना मागविण्यात आल्या आहेत. आयोगाच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निवेदन सादर करण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात व्यक्ती आणि प्रतिनिधींनी नोंदणी केली.

पाचही जिल्ह्यातून निवेदने
पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील ओबीसी संघटनांचे प्रतिनिधींसोबत अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधींनीही निवेदने देत आपली भूमिका मांडली. आयोगाने निवेदने देण्यासाठी सकाळी ९.३० ते ११.३० अशी वेळ ठेवली असताना नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता दुपारी १.३० वाजेपर्यंत निवेदने स्विकारण्यात आली.

राजकीय पक्षांसह विविध ८१ संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनीदेखील आपली मते नोंदवली. यामध्ये अखिल भारतीय कुंभार समाज संस्था, कुणबी समाज संघ पुणे, ओबीसी वेलफेअर फाऊंडेशन, पुणे जिल्हा बारा बलुतेदार महासंघ, राष्ट्रीय छावा संघटना, अखिल भारतीय माळी समाज संघ, समता बेलदार समाज संस्था, कोष्टी समाज सेवा मंडळ, मुंबई, अखिल भारतीय बारी समाज महासंघ, अखिल भारतीय ओतारी समाज सेवामंडळ, मुस्लिम छप्परबंद भटकी विमुक्त विकास संस्था, राष्ट्रीय गुरव समाज महासंघ, प्रांतिक तैलिक महासभा पश्चिम महाराष्ट्र, राष्ट्रीय विणकर सेवासंघ, अखिल महाराष्ट्र सुतार लोहार महासंघ, कोलाटी डोंबारी समाज संघटना, ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशन पुणे, ओबीसी संघर्ष समिती, कुंभार समाज उन्नती मंडळ, अखिल भारती महात्मा फुले समता परिषद पुणे, न्यू सलून पार्लर असो., मराठा सेवक समिती, नाभीक विकास परिषद, शिंपी समाज मंडळ, सकल मराठा समाज सोलापूर, मराठा सेवा संघ सांगली, यासह विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली.

समर्पित आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया, सदस्य महेश झगडे, डॉ. नरेश गिते, ह.बा.पटेल, सदस्य सचिव पंकज कुमार, डॉ. शैलेशकुमार दारोकार, प्रा. जेम्स यांच्या उपस्थितीत निवेदने स्विकारण्यात आली. या सर्व निवेदनांची नोंद आयोग घेत असल्याची माहिती समर्पित आयोगाच्या सदस्य सचिवांनी दिली आहे.

यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुणे विभागातील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदा, किंवा महानगरपालिकेत या संदर्भातील निवेदने प्राप्त झाल्यास ती आयोगाकडे पाठवावीत, अशा सूचना आयोगाने दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, माजी सनदी अधिकारी मोहन ठोंबरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, तसेच आयोगाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

समर्पित आयोगाला निवेदन देण्यासाठी पुणे विभागाच्या विविध भागातून आलेले प्रतिनिधींनी सकाळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्याच्या प्रतिनिधींना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. आलेल्या प्रत्येक प्रतिनिधींना आपले म्हणणे मांडण्याची आणि निवेदन देण्याची संधी देण्यात आली. आयोगाने पुणे विभागाने केलेल्या व्यवस्थेविषयी समाधान व्यक्त केले.

Web Title :- Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

Tags: Akhil Bharatiya Kumbhar Samaj SansthaAkhil Bharatiya Mali Samaj SanghGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiKolhapurKunbi Samaj Sangh Punelatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on pune newsOBC AssociationOBC Welfare Foundationpolitical partypunePune District Bara Balutedar MahasanghPune Divisionpune latest news todayPune Municipal Commissioner Vikram KumarPune NewsPune News latestPune News marathiPune News today marathiRashtriya Chhava SanghatanaSamata Beldar Samaj SansthasangliSataraSolapurState governmentSupreme Courttodays pune newsअखिल भारतीय कुंभार समाज संस्थाअखिल भारतीय माळी समाज संघओबीसी वेलफेअर फाऊंडेशनओबीसी संघटनाकुणबी समाज संघ पुणेकोल्हापूरगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याग्रामविकास विभागजिल्हा परिषदाजिल्हाधिकारी कार्यालयपुणेपुणे जिल्हा बारा बलुतेदार महासंघपुणे दौरापुणे महानगरपालिका आयुक्त एमएमसी अ‍ॅक्टपुणे विभागराजकीय पक्षराज्य शासनराष्ट्रीय छावा संघटनासमता बेलदार समाज संस्थासर्वोच्च न्यायालयसांगलीसातारासामाजिक संस्थासोलापूरस्वराज्य
Previous Post

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

Next Post

Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात इंधनाचे दर; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

Next Post
Petrol-Diesel Prices Today | petrol and diesel price may rise again check todays 23 may 2022 rate

Petrol-Diesel Prices Today | कंपन्या पुन्हा वाढवू शकतात इंधनाचे दर; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Maharashtra Rains | मुंबईकरांनो काळजी घ्या ! आगामी 5 दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला यलो ‘Alert’ – IMD

4 days ago

Gold-Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

4 days ago

GST Council Meet | ऑनलाइन गेमिंगवरील निर्णय रखडला, काय स्वस्त काय महाग; ‘ही’ आहे यादी

5 days ago

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 71 जणांवर कारवाई

4 days ago

Nikki Tamboli Viral News | निक्की तांबोळी झाली कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करून म्हणाली…

3 days ago

Maharashtra Political Crisis | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत उध्दव ठाकरेंना 4 वेळा सांगितलं होतं ? जाणून घ्या

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat