पुणे : बहुजननामा ऑनलाइन – गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडे पोलिसांना दीड किलो गांजा मिळाला आहे.
अर्जुन दिगंबर जाधव (वय ५२, रा. कात्रजगाव, मूळ- कुंभेफळ, ता. परंडा, उस्मानाबाद) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी आंबेगाव पठार परिसरात गायमुख चौकात एक व्यक्ती लाल रंगाची पिशवी घेऊन दिसला. तो पोलिसांना पाहून पळाला. तत्काळ पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्यावेळी त्याच्याकडे खाकी रंगाच्या कागदामध्ये संशयास्पद वस्तू असल्याचे आढळून आले. त्याची पाहणी केली असता, त्यामध्ये दीड किलो गांजा आढळून आला. तो गांजा विक्रीसाठी आणला असल्याचे त्याने सांगितले.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, उपनिरीक्षक नितीन शिंदे, कर्मचारी सोमनाथ सुतार, रवींद्र भोसले, सर्फराज देशमुख, सचिन पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.