पुणे : बहुजननामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील महत्वाचे पोलीस ठाणे असलेल्या दत्तवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांची पुणे शहर आयुक्तालयातून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. डिजी ऑफीसने या बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यानंतर दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून कृष्णा इंदलकर याची नियुक्ती केली आहे. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी हे आदेश दिले आहेत.
कृष्णा इंदलकर हे पूर्वी चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांची वाहतूक शाखेत बदली झाली होती.