पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कासेवाडीत बंद फ्लॅट फोडून 10 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगीता अनिल केदारी (वय ४७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारी या १४ डिसेंबर रोजी कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. डब्यात ठेवलेले दहा हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दुसऱ्या दिवशी तक्रारदार आल्यानंतर घरफोडीचा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास खडक पोलीस करतात.
बघून हसल्यावरून झालेल्या वादात तरुणाला चौघांनी जबर मारहाण केल्याची घटना उंड्री येथे घडली. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देवानंद ईश्वर कामठे, संकेत विठ्ठल भिंताडे, पंकज कामठे, परमार माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपीचा मित्र तुषार साहू याच्यासोबत एकमेकांकडे बघून हसल्यामुळे तक्रारदार यांची भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी बुधवारी रात्री येऊन डोक्यात लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.