पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे म्हाडाच्या (Pune MHADA) वतीने सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल 2 हजार 908 घरांची सोडत काढली होती. कोरोना संकट (Corona crisis ) असतानाही म्हाडाच्या घरांना प्रचंड प्रतिसाद (response) मिळाला असून, 3 हजार घरांसाठी 57 हजार लोकांनी अर्ज केला आहे. आता या घरांची सोडत जून अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पुणे Pune News म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील (Pune MHADA Chief Officer Nitin Mane-Patil) यांनी दिली.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापुर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 2908 घरांची सोडत काढली होती. कोरोनाचे सावट असतानाही 6 महिन्यांत दोन वेळा तब्बल 2 हजार पेक्षा अधिक घरांची सोडत काढण्याचा नवा विक्रम पुणे म्हाडाने केला आहे.
यात सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यातील म्हाडाच्या 2 हजार 153 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील प्राप्त झालेल्या 755 सदनिका अशा एकूण 2 हजार 908 सदनिकेच्या अंतिम नोंदणीसाठी 13 मेपर्यंत मुदत होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन् नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव सदर जाहिरातील योजनेत अर्ज करण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार अर्ज करण्यासाठी 13 जूनपर्यंत मुदत दिली होती, ती काल संपली आहे.
कृपया हे देखील वाचा:
Sambhajiraje Meets Uadayanraje | ‘दम असेल तर अधिवेशन बोलवावं, आधी राज्याने धाडस करावं, केंद्राचं मी बघतो’; उदयनराजे संतापले (व्हिडीओ)
काय सांगता ! होय, 74 % भारतीय कर्मचार्यांना आवडला ’वर्क फ्रॉम होम’ पर्याय
Pune News | शहरातील न्यायालयांचे कामकाज ‘या’ तारखेपासून दिवसभर पूर्ण क्षमतेने सुरू राहणार
उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार ? सुप्रिया सुळे म्हणाल्या…