बहुजननामा ऑनलाइन टीम – वानवडी सारख्या परिसरात 1200 स्केवरफूट जागेवर ताबा मारत एका विधवा महिलेला धमकवल्याचा प्रकार पोलिसांनी उजेडात आणला आहे. पाच वर्षांपासून ताबा मारत या जागेवर भाडेकरू(FIR against Mehboob Sheikh ) ठेवले होते. अनेकवर्षं प्रयत्न करून देखील महिलेला न्याय मिळत नव्हता. मात्र, वानवडी पोलिसांनी महिलेला न्याय दिला आहे.
याप्रकरणी मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई (रा. हडपसर) व साथीदारांवर जागा हडप करणे, धमकावणे यासह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुंबईतील एका महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुंबईत असतात. त्यांची सय्यदनगर सर्व्हे न 75 मध्ये मालकी हक्काची 1200 स्केवरफूट जागा होती. यादरम्यान आरोपींनी महिलेच्या जागेचे बनावट दस्तऐवज बनविले. त्यानंतर या महिलेच्या जागेवर ताबा मारून पत्र्याच्या खोल्या बांधल्या. तसेच या खोल्या बांगलादेशी नागरिकांना भाड्यानं दिल्या होत्या. याबाबत त्यानी आवाज उठवला असता त्यांना घरी जाऊन धमकावले जात असे. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत. दरम्यान त्या न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र न्याय मिळत नव्हता. याबाबत त्यांनी यावेळी धाडस करून वानवडी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी देखील त्यांना तात्काळ धीर देत कारवाईचे आश्वासन दिले. महिलेने मेहबून शेख उर्फ पिट्याभाई याचे लँड माफिया तसेच गॅंगवारशी संबंध असल्याचे म्हंटले असून, त्याचे पुरावे सादर केले आहेत. पोलिसांनी पूर्ण शहानिशा करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.